गडचिरोलीत उद्या ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत टू डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिर • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुढाकार

0
2

गडचिरोली:

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ५ जुलै रोजी गडचिरोली येथे ० ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत २D Echo व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील गरजू व जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी केले आहे.या शिबिरात ठाणे येथील प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलचे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग उपस्थित राहून बालरुग्णांची तपासणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार मुलांची २D Echo तपासणी, पुढील उपचार तसेच हृदय शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन लाभणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील मुलांसाठी हे शिबिर विशेष फायदेशीर ठरणार आहे.

ही लक्षणे आढळल्यास शिबिराचा लाभ घ्या:

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशनच्या वतीने पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, मुलांमध्ये खालील लक्षणे आढळल्यास या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा:

  • मुलाला लवकर थकवा येणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • छातीत दुखणे

  • वजन न वाढणे

  • ओठ किंवा नखे निळसर दिसणे”कोणताही पालक आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलाच्या हृदय तपासणी व उपचारापासून वंचित राहू नये, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिराचा तपशील:

  • दिनांक: रविवार, ५ जुलै

  • वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत

  • स्थळ: जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

  • या संदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख प्रवीण ला. बा. शर्मा, जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, संपर्क प्रमुख सत्यपाल कत्तरवार, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. संगिता राऊत (अमरावती), संपर्क प्रमुख मनिष अग्रवाल, जिल्हा प्रमुख आमकार उपलवार, नीलंकठ गादेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.