राहुल गांधींनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली.. जयंतीदिनी एक्स हँडलवर केल ट्विट.

0
365

नवी दिल्ली:

आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.मात्र काँग्रेस चे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कडून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना चक्क श्रद्धांजली वाहिली आहे.
राहुल गांधी यांच्या एक्स हँडलवर त्यांनी हे ट्विट केलं असून,त्यामुळे एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्याला जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात की श्रद्धांजली वाहतात हे न कळावे हा एक मोठा प्रश्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र सोबतच देश विदेशात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते.ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मात्र राहुल गांधींनी ट्विट करताना केलेल्या चुकीवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.त्यांची ही चूक अक्षम्य असून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.