अहेरी:
त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्ताने भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत पात्र ठरलेल्या विजेत्यांना नुकतेच बक्षीसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षेचे आयोजन एम्प्लॉईज फॉर पीपल्स स्टुडन्ट अहेरी करण्यात आले होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थीनी कु. कीर्ती गोपाल ओशाके व द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी कुमारी अंजली वेंकटस्वामी गावतुरे यांना बक्षीस वितरित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक रहीम शेख व माध्यमिक शिक्षक खुशाल रणदिवे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रसंगी माध्यमिक शिक्षक खुशाल रणदिवे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानावर सुद्धा भर द्यावा असे ते म्हणाले.
प्रसंगी संतोष गणपुरपवार,सुरेश सातपुते, सत्यम कोडापे किशोर गुरनुले यांची उपस्थित होती.




