आल्लापल्ली:
संघमित्रा बौद्ध विहार, आल्लापल्ली येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प शनिवार, दि.15ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7.00. वाजता धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील, भीमस्तुती व धम्मपालन गाथेचे वंदन केले.
यानंतर आयु. जयंत गजभिये साहेब यांनी सुंदर भीमगीत सादर केले.” वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथे पुष्प” “ डॉबाबासाहेबआंबेडकर आणि भारतीयस्वातंत्र्य” या विषयावर डॉ. प्रभाकर घोडेस्वार सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्य दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि”समता”, “समतेशिवाय स्वातंत्र्याची कल्पना अशक्य आहे” यावर त्यांनी सन 1757 ची प्लासी ची लढाई ते चवदार तळ्यात सत्याग्रह व काळाराम मंदिर मुक्ती संग्राम असे विविध उदाहरण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य याची संकल्पना त्यांनी अतिशय प्रभावीपणे उपस्थित समोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. जेसिकाताई करमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. इंदिराताई करमे यांनी केले. कार्यक्रमानंतरच्या खीर दान आयु. भीमराव झाडे साहेब व परिवार यांनी दिले.
वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या धम्म प्रवचन मालिकेला बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आल्लापल्ली; भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण); भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण) महिला शाखा; भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा अहेरी; महामाया महिला मंडळ, आल्लापल्ली आणि बहुउद्देशीय महिला मंडळ, आल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
संघमित्रा बौद्ध विहाराचे अध्यक्ष आयु. कार्तिक निमसरकार साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. बानयाजी दुर्गम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व उपासक-उपासिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. मान्यवरांना पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली




