भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया वर धडक

0
71

अहेरी

भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी दि. २१.०१.२५ रोजी अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी, कार्यालया वर धडक देत लोहखनिजाची प्रस्तावित वाढीव लीज सुनावणी प्रक्रिया एटापल्लीत घेण्यात यावी या संदर्भात निवेदन दीले. सविस्तर वृत्त असे कि, मागिल काही वर्षा पासून सुरू असलेल्या एटापल्ली तालुक्यातील लोहखनिज उत्खनन प्रक्रियेत अनेक समस्या निर्माण झाल्या. प्रामुख्याने जल,जंगल,जमीन या आदिवासींच्या हक्कांना पायदळी तुडवत एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडावर मागील चार वर्षांपासून लोहखनिज उत्खनन करून विविध कंपन्यांना विकण्यात येत आहे. मात्र या लोहखनिज उत्खनन प्रकल्पात आदिवासींचे मूलभूत हक्क असलेले जल, जंगल,जमीन चे हक्क पायदळी तुडवून, त्यांच्या जीवाशी खेळून खाजगी कंपन्या आता एटापल्ली सह जिल्ह्यावर राज करण्याचे बघत आहे असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते भाग्यश्री आत्राम यांनी केला आहे.

काही वर्षांपूर्वी लॉयड मेटल अँड एनर्जी कंपनीस सुरजागड पहाडावर 348.09 एवढ्या भागात उत्खननाचे लीड देण्यात आली होती. यावेळी स्थानिक आदिवासींना या प्रकल्पात रोजगार देऊ आणि त्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणा देउ व चांगल्या पदावर नोकरी देऊ असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण देण्याता आले नसून आदिवासी बेरोजगार तरुणांना यांच्या हक्काचे जंगल आणि जमीन असलेल्या प्रकल्पात चौकीदार या पदावर ठेवून बोळवणा करण्यात येत आहे.

निवेदनातील स्पष्ठ स्वरूप बघता नुकताच प्रशासनाने या प्रकल्पाची लीज वाढवून 60 दशलक्ष टन, इतके मेट्रिक टन उत्खनन करण्याचे निर्देश दिले, प्रामुख्याने या बाबत जनसुनावणी होणे आवश्यक आहे. मात्र ते स्थनिक एटापल्ली ऐवजी २०० किमी दूर जिल्हा मुख्यालयी घेण्याचा बेत रचला गेला आहे, व आदिवासी जानतेला शेरते शेवटी जनसुनावणी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

नदीच्या पाण्याचा वापर करून कोरडा दुष्काळ आणणार काय??

60. दश लक्ष टन लाख मेट्रिक टन लोह खनिज उत्खननाची परवानगी लॉयड मेटल अँड ऐनर्जी कंपनीने मागितली आहे. एटापल्ली तालुक्यातील बांडे गाव ते कोलासरी मार्गे पाईप लाईन टाकून लोह युक्त कच्चा माल हा पाण्याच्या आणि हवेच्या दबावाने नेण्यात येणार आहे. मात्र यासाठी भामरागाड आगि एटापल्ली तालुक्याला संजीवनी असलेल्या बंडिया नदी तून पाणी लिफ्ट करून याच पाण्याच्या वापर करून कच्चा माल पाठविण्याचा डाव आहे.

या नदीच्या पाण्यामुळे बहुतांश भाग हा ओलिताखाली असतो आणि त्यामुळे नदी परिसरातील भाग हा हिरवा असून मोठा मोठ्या झाडांना याचा नदीतून पाणी मिळते. मात्र या नदीचचे पाणी कंपनीने पळवून नेल्यास एटापल्ली आणि भामरागड तालुका हा कोरड्या दुष्काळ खाली येणार आहे त्यामुळे बांदिया नदीतून पाणी लिफ्ट करून कंपनीला देण्याची परवानगी रद्द करण्यात यावी आणि भविष्यातील होणान्या दुष्काळाला आधीच थांबविण्यात यावे, अशी चिंता जनक बाब ही त्यांनी निवेदनातून मांढली.

जनसुनावणी स्थानिक ठिकाणीच घ्या

कोनसरी येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पा बाबत काही आक्षेप असल्यास जनसुनावणी ही कोन्सरी गावातचा घेण्यात येत असून मात्र लोह युक्त कच्चा माला उत्खनन करण्याची जनसुनावणी ही एटापल्ली तालुक्यातीला हेडरी किंवा तालुका मुख्यालयी घेण्यात आली पाहिजे होती मात्र सामान्य जनतेचा आवाज आणि विरोध होऊ नये यासाठी मुद्दामा ही जनसुनावणी गडचिरोली येथे घेयाचा बेत रचला आहे.

अश्या विषयांच्या अनुषंगाने भाग्यश्री आत्राम व चारही तालुक्यांतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी व सदस्य श्रीनिवास विरगोनवार ,अब्दुल रहमान (हिम्मा) ,अनुराग बेझलवार, अमोल रामटेके,अक्षय कविराजवार ,स्वप्नील श्रीरामवार,रामन्ना कस्तुरवार ,राहुल दुर्गे ,शैलेश गेडाम,टाटाजी गेडाम उपस्थित होते.