व्हॉइस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार तर सचिव पदी विलास ढोरे यांचे निवड…

0
22

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेची ची बैठक जेष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस गडचिरोली येथे पार पडली. व्हाईस ऑफ मिडिआचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्या सोबत व्हिडिओ कॉम्फरन्स‌द्वारे संवाद सांधल्या नंतर सदर बैठकीत सर्वानुमते व्यंकटेश दुडमवार यांची व्हाईस ऑफ मिडिया जिल्हा गडचिरोली जिल्ह्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा सचिवपदी विलास ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

सदर बैठकीला प्रा. मुनिश्वर बोरकर, संजय तिपाले चेतन गहाणे, मारोती भैसारे, कालीदास बन्सोड, जयंत निमगडे, आशिष अग्रवाल’ फिरोज लालानी, रुषी सहारे • सुरज हजारे, सुनिल नंदनवार, हितेश ठेंगे, सोमनाथ उईके, मिलिंद खोंड, तिलोतमा हाजरा, कृष्णा वाघाडे’ सुमित पाकलवार, शेषराज संगिडवार’ आनंद विश्वास, तेजश गुज्जलवार,शरीफ कुरेशी, राहुल अंबादे आदि सहीत जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.
येत्या काळात नवीन जिल्हा कार्यकारीणी व तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे.