अहेरी पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक! २१.५३ लाखांचा सुगंधी तंबाखू व अवैध बीटी बियाणे न्यायालयाच्या आदेशाने ‘भस्मसात’

0
3

अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले; पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक

अहेरी:गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर कायद्याचा जरब बसवत अहेरी पोलिसांनी आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सन २०२५ मधील विविध आठ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला, मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधी तंबाखू आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अवैध बीटी बियाणांचा भलामोठा साठा आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ‘भस्मसात’ करण्यात आला.एकूण २१ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल नष्ट

कायद्याच्या चौकटीत राहून, माननीय न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आज दोन पंचांच्या उपस्थितीत ही नष्टीकरण मोहीम अत्यंत पारदर्शकतेने राबवण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र.

जप्त केलेला मुद्देमाल

एकूण किंमत (रुपये)

१.

मानवी आरोग्यास घातक सुगंधी तंबाखू

११,९०,१८०/-

२.

शेतकऱ्यांची फसवणूक करणारी अवैध बीटी बियाणे

९,६२,९६२/-

एकूण किंमत

२१,५३,१४२/-

समाजाला व्यसनाच्या खाईत लोटणारा सुगंधी तंबाखू आणि अन्नदात्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारे अवैध बियाणे जप्त करून, आज त्याचा अस्तित्वच संपविण्यात आले आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि अहेरी पोलिसांची धडक कृतीही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया माननीय पोलीस अधीक्षक मा. एम रमेश सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मा. कार्तिक मधिरा सर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजय कोकाटे सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अहेरी पोलीस स्टेशनचे धडाडीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या थेट देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली.पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या या पारदर्शक आणि आक्रमक पवित्र्यामुळे अहेरी परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे पार दणाणले आहेत. अहेरी पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून आणि विशेषतः शेतकरी वर्गातून जोरदार कौतुक होत आहे.