ग्रामीण भागातील महिलांना रोजगारासोबत शिक्षण देऊन स्वयंपूर्ण करणार :-नितु जोशी अध्यक्षा मियाम गैरसरकारी सामाजिक संस्था

0
10

ग्रामीण भागातील महिलांना रोजगारासोबत शिक्षण देऊन स्वयंपूर्ण करून त्यांना आपल्या पायावर उभ्या करण्याचा आपला संस्थेचा उद्देश असल्याचे प्रतिपादन मियाम गैरसरकारी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष नितु जोशी यांनी केले आहे.
आपल्या संस्थेचा पाया मानवता,संस्कृती आणि संस्कार यावर आधारित असून या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षण देऊन स्त्रियांना, बेरोजगार तरुणांना साहाय्य करून आर्थिक पाठबळ देण्यासाठी आपण व आपली संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना खानपान उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध करून देणे त्यासोबत त्यांनी बनविलेल्या वस्तुंना बाजारपेठेत मागणी उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे.

अशिक्षित महिलांना साक्षरता वर्गाच्या माध्यमातून अक्षरओळख करून देण्यात येत आहे जेणेकरून त्यांना हिशोब करता यावा आणि आपली स्वाक्षरी करता यावी.
त्यासोबत संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक प्रमाणे अकादमी वडळापेठ येथे सुरू करण्यात आली आहे. यूपीएससी व एमपीएससी ,शासकीय नौकरी साठी परीक्षेची तैयारीं करण्याऱ्यासाठी बस ची सुद्धा सुविधा देत आहोत.
प्राणी संरक्षणासाठी ही आमची संस्था कार्यरत असून या भागात सापांचा मोठा अधिवास आहे मात्र ,निसर्गचक्रात सापाची मोठी भूमिका आहे तरी या भागात गैरसमजामुळे सापाला मारले जाते त्यासाठी जनजागृती करून युवकांना साप पकडण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.स्नेक स्टिक त्यांना देण्यात येत आहे.
शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना कॉलेज मध्ये अडमिशन करून देऊन रोजगाराच्या सोबत शिक्षणाची सोय उपलब्ध करू देण्यात येत आहे.
त्यासोबत व्यावसायिक शिक्षण व संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य विकसित करणे आमचे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या..