अहेरी :-
प्रधानमंत्री जल जीवन प्राधिकरण घर-घर नळ योजनेंतर्गत ग्रामपंचायत नागेपल्ली व आलापल्ली साठी शासनाकडून दहा कोटी रु. खर्च करून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्या कारणाने पाणी पुरवठा सुरु केले असता जे पाईप वापरून पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे ते पाईप ठीक – ठिकाणाहून फुटून जातात व यामुळे रस्त्यावर व नालीमध्ये पाणी जातो, एक दिवस पाणी सुरु केले कि, ठिक-ठिकाणी लिकेज असलेल्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरतो.
या कारणाने ग्रामपंचायत नागेपल्ली व आलापल्ली येथील जनतेला शुध्द पिण्याचे पाण्यापासून मुकावे लागत आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामपंचायतला वारंवार तोंडी तक्रार केलेली आहे
तरीपण या बाबीकडे हेतुपुरस्पर ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप विजया विठ्ठलानी माजी जिल्हा परिषद सदस्या यांनी केली आहे. कंत्राटदार इंजिनीअर व ग्रामपंचायतिच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे शासनाच्या चांगल्या योजनेचा लाभ जनतेस मिळत नाही. आजतागायत हि शासनाची योजना बंदच आहे.
तरी महोदय या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करून संबंधित योजना सुरळीत करून जनतेस शुद्ध पिण्याचे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपमुख्याधिकारी इंगोले मॅडम यांच्या कडे निवेदनात करण्यात आले आहे.
यावेळी विजया विठलानी माजी जि.प. सदस्या आलापल्ली, विजय खरवडे,निर्मला उपलांजिवार,प्रमिला फरकाळे,शालिनी पोहनेकर नगरसेविका अहेरी,वैशाली सौरगपते,, ह्या उपस्थित होते.




