माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी पद्मविभूषण’ रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली.

0
23

अहेरी:

अहेरी शहरातील प्रभाग क्र. 06 शिवाजी नगर येथे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रीशराव आत्राम यांनी देशाचे
दिग्गज व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र भूषण, ‘पद्म विभूषण’ रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राजे म्हणाले, माझी अनेकवेळा भेट झाली, त्यांची साधी राहणीमान आणि उच्च विचाराचे धनी होते. सर्वांना
त्यांची आठवणी कायम स्मरणात राहतील आणि त्यांचे जीवन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

यावेळी शिवाजी नगरवासी सह शहरातील प्रतिष्टीत नागरिक, व्यापारी, चाण्यक्य अकादमी चे युवा तरुण तरुणी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.