सातबारा मिळत नसल्याने शेतकरी शासकीय योजनांपासून वंचीत.. तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने सातबारा द्या

0
33

अहेरी:

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत मेडपल्ली अंतर्गत येणारा तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने सातबारा दिल्या जात होता मात्र 2021 पासून शेतकऱ्यांना सातबारा देणे बंद करण्यात आल्याने शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.शेतकऱ्यांना हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देण्याची मागणी गावकऱ्यांनी अहेरीचे तहसीलदार यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
अहेरी तालुक्यातील तुमिरकसा हे महसूल विभागाचा नोंदणी मध्ये कासमपल्ली मासहतच्या नावाने नोंद आहे त्यानुसार 2020-21 या वर्षापर्यंत तलाठी कार्यालय मेडपलीकडून तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने शेतीचे हस्तलिखित सातबारा ही दिलेला आहे.
परंतु 2021 नंतर तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना महसूल विभाग व मेडपल्ली तलाठी साजा कडून कासमपल्ली मसाहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आला. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजना चा लाभ मिळत नाही
तलाठ्यांना कासमपल्ली मसाहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देण्याचे निर्देश द्यावेत. शासनातर्फे राबवण्यात येणारे विविध योजनांचा लाभ घेता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी अहेरीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून विनंती केली आहे
त्यावेळी,पेसा अध्यक्ष महारु तलांडी शा, व्य, समितीचे अध्यक्ष श्री बाबुराव तलांडी श्री लालु तलांडी श्री देसू तलांडी श्री नस्सा आत्राम श्री रमेश नरोटे श्री बिच्चु तलांडी श्री चरणदास नैताम श्री राजु गावडे श्री राकेश तलांडी देवाजी नरोटी श्री पुसू तलांडी श्री मंगरु आत्राम श्री सौरभ तलांडी इत्यादी गावातील शेतकरी उपस्थित होते.