पेरमिली केंद्रात नव साक्षरता व संख्याज्ञान चाचणी  संपन्न

0
2

अहेरी

पेरमिली केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी 2026 यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवसाक्षरता अभियानांतर्गत निरक्षर व्यक्तींमध्ये अक्षर ओळख निर्माण करणे, वाचन-लेखनाची प्राथमिक कौशल्ये विकसित करणे तसेच मूलभूत संख्याज्ञान दृढ करणे हा आहे.

शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी साक्षरता व संख्याज्ञान या दोन मूलभूत घटकांवर विशेष भर देण्यात येत आहे.

सदर चाचणी पेरमिली केंद्रातील सर्व शाळांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात घेण्यात आली. केंद्रप्रमुख डॉ. दिवाकर नारनवरे तसेच गटशिक्षण अधिकारी श्री. सुनील आईंचवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी नियोजनपूर्वक कार्य करत ही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली.

या उपक्रमामुळे नवसाक्षर व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा अधिक सक्रिय सहभाग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा उपक्रमांद्वारे साक्षरतेचा दर वाढवण्यास निश्चितच हातभार लागेल.