अहेरी:–
येथील पंचायत समितीच्या सभागृहात शनिवार 25 जुलै रोजी वृद्ध कलावंत तपासणी समिती दाखल झाली व वृद्ध कलावंतांचे कागदपत्रांची तपासणी केले. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून अहेरी येथे समिती दाखल झाले व तपासणी शिबिर पार पडले.समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी व नोझल अधिकारी सुरेंद्र गोंगले, विस्तार अधिकारी मुलचेरा मंगल डाखरे, कुरखेडा येथील सचिन मांडवगडे, अशासकीय सदस्य म्हणून संदीप राऊत, धनपाल कार, राजेंद्र बोबाटे, नारायण मंडल व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार आदी मान्यवर होते.महाराष्ट्र शासनाची वृद्ध कलावंत व मानधन योजना सध्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना म्हणून ओळखली जाते वय वर्षे 50 किंवा त्याहून अधिक असलेल्या गरजू व पात्र कलाकारांना आर्थिक मदत शासनातर्फे मिळते.अहेरी तालुक्यातील प्रामुख्याने अहेरी, गोविंदगाव, मरपली, सुधागुडम आदी आणि सिरोंचा तालुक्यातील असंख्य गावातील कलावंत समितीसमोर कागदपत्रे तपासणी साठी सादर केले. लवकरच पात्र कलावंतांना दरमहा प्रत्येकी पाच हजार मानधन मिळणार असून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले आहेत




