गडचिरोली:19डिसेंबर
द-गोटूल वृत्तसेवा
अहेरी तालुक्यातील राजाराम आणि परिसरातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर करण्यासाठी, राजाराम येथे आगामी खरीप हंगाम २०२५-२६ साठी स्वतंत्र धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी मा. अविश्यात पंडा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कमलापूर केंद्रावर अवलंबून राहण्याची नामुष्कीप्राप्त माहितीनुसार, राजाराम येथे १० ते २० वर्षांपूर्वी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत होती. मात्र, काही कारणास्तव ही संस्था कमलापूर येथे स्थलांतरित करण्यात आली. याचा मोठा फटका राजाराम परिसरातील खांदला, पत्तीगाव, चिरेपली, मरनेली, रायगट्टा, गोलाकर्जी, तिमरम, गुड्डीगुडम आणि झिमेला यांसारख्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना बसत आहे. या शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या कमलापूर केंद्रावर जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.पायाभूत सुविधा उपलब्धनिवेदनात नमूद केल्यानुसार, राजाराम येथे धान खरेदी केंद्रासाठी ग्रामपंचायतीची ४ एकर जागा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या जागेवर वन व्यवस्थापन समितीचे गोडावूनही (कोठार) उपलब्ध आहे. सदर जागेची नोंदणी (रजिस्ट्री/नोटरी) राजाराम आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नावाने करून देण्यास ग्रामपंचायत तयार आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी केंद्र सुरू करण्यास तांत्रिक अडचण नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.शिष्टमंडळाने मांडली व्यथाजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:श्री. सदू पेंदाम (सभापती, आदिवासी वि. कार्यकारी सह. संस्था)श्री. अरविंद परकीवार (संचालक)श्री. भास्कर तलांडे (माजी सभापती, पं. स. अहेरी),श्री. रोशन कंबगोणीवार (उपसरपंच)श्री. नारायण कंबगोणीवार (माजी उपसभापती),श्री. मुत्ता पोरतेट, श्री. दीपक अर्का व अन्य ग्रामस्थांचा समावेश होता.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता, प्रशासनाने या खरीप हंगामात राजाराम येथे केंद्र कार्यान्वित करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.




