गडचिरोली:
कारगिल युद्धातील शूर वीर जवानांच्या अमर बलिदानाला कृतज्ञतापूर्वक मानवंदना देण्यासाठी कारगिल विजय दिवस मोठ्या गौरवाने कारगिल चौक, गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.
कारगिल चौक, दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली आणि कारगिल स्मृती समिती यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या अभिमानदायक उपक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून शहीद जवानांच्या स्मृतीस्थळास पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांना आदरांजली वाहिली व आपल्या मार्मिक भाषणातून त्यांनी देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडलेल्या वीर सैनिकांचे शौर्य, समर्पण आणि त्याग यांचे स्मरण करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची ऊर्जा निर्माण केली.
यावेळी लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, माजी खासदार अशोक नेते, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते, उदय धकाते, राजू साळवे, संजय मेश्राम, प्रकाश भांडेकर, मोरेश्वर सहारे, हरबाजी मोरे, जावेद खान तसेच विद्यार्थी, महिला, माजी सैनिक, विविध शासकीय अधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




