अहेरी:
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री महेश भाऊ केदारी तसेच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वासुदेवजी शेडमाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख श्री दिलीप भाऊ सुरपाम यांच्या नेतृत्वामध्ये उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळ वाटप करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला..
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी
रुग्णांची आस्थेने चौकशी केली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णांना फळ बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला संघटिका चंदना बिश्नोई, तालुकाप्रमुख प्रफुल येरणे,रवी कप्पा, राकेश आत्राम, मोनू सलामे, रुपेश बंडेला आदी. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनीकांची उपस्थिती होती.




