अहेरी :
मंगळवारी व बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे आलापल्ली अहेरी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी खालच्या भागात पावसाचे पाणी घुसल्याने नुकसान झाले.बीएसएनएल टॉवर नजीक असलेल्या फुकट नगरामध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने येथील रहिवासी लोकांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते मदत साहित्य पाठवन्यात आले ते १७ कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आले.
मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी घुसून नुकसान झाले. परिस्थिती पाहून शरदचंद्र पवार गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत प्रत्येक कुटुंबाला राशन किट देण्यात आले.
ताईंनी सांगितले: “पुढेही कोणतीही अडचण उद्भवली, तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभी राहीन.”अशी ग्वाही दिली
राशन किट वाटपावेळी नरेश मादेशी, विजय कोहराम, श्रीमती मडावी, श्रीमती सुंगधा ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार आदींची उपस्थिती होती.




