अहेरी:11 जानेवारी.
द -गोटूल वृत्तसेवा
पेरमिली केंद्राची सातवी शिक्षण परिषद दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोरेली खुर्द येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. या शिक्षण परिषदेने शिक्षकांच्या विचारविश्वाला नवी दिशा देत शिक्षणाच्या व्यापक अर्थाचा पुनर्विचार घडवून आणला.परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मा. डॉ. दिवाकर नारनवरे तर उद्घाटक म्हणून मा. लक्ष्मण तलांडे (पाटील) .प्रमुख पाहुणे म्हणून श्री लालसु पुंगाटी, श्री धर्माजी चांदेकर, श्री कृष्णा मुंजमकर, श्री किशोर सुनतकर इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री देवाजी दुर्गे यांनी सुमधुर आवाजात राज्यगीत सादर केले व संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून लोकशाही मूल्यांची जाणीव करून दिली.प्रास्ताविक करताना श्री कृष्णा मुंजमकर यांनी, “शिक्षण परिषद म्हणजे केवळ माहितीची देवाणघेवाण नसून, विचारांची मशागत करणारे प्रभावी व्यासपीठ आहे,” असे सूचक प्रतिपादन केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. डॉ. दिवाकर नारनवरे यांनी आपल्या सखोल, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषणातून परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले आणि“शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. त्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर शिक्षकांनी सातत्यपूर्ण सर्वकक्षमूल्यमापन प्रभावीपणे राबवणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना त्यांनी शिक्षकांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता, मूल्यसंस्कार आणि चिंतनक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले.“माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षकांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. शिकवणारा शिक्षक हा स्वतः शिकत राहिला, तरच खऱ्या अर्थाने तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक ठरतो,” असे मोलाचे विचार त्यांनी मांडले.परिषदेच्या दुसऱ्या सत्रात इयत्ता ४/५ व ७/८ शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिका आयोजित करण्यात आल्या.श्री अजय थुल यांनी इयत्ता पाचवी गणित विषयावर प्रभावी अध्यापन केले.श्री संतोष चिकाटे यांनी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीसाठी मराठी व इंग्रजी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले.श्री धर्माजी चांदेकर यांनी इयत्ता ७/८ साठी मराठी विषयाची तासिका घेतली.त्यानंतर श्री कृष्णा मुंजमकर यांनी बुद्धिमत्ता विषयावर सखोल मार्गदर्शन केले.लघु विश्रांतीनंतर श्री साईनाथ लेकुर यांनी शालेय पोषण आहार, VSK, निपुण चाचणी तसेच ऑनलाईन शैक्षणिक कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर केंद्रप्रमुख डॉ. नारनवरे यांनी शाळांचा कार्यालयीन आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगानाने झाली. सूत्रसंचालन संतोष चिकाटे यांनी केले, तर कोरेली खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल कलकोटवाय यांनी उपस्थितांचे आभार मानले.या शिक्षण परिषदेत पेरमिली केंद्रातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही परिषद म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर शिक्षणाच्या मूल्यांना नव्याने उजाळा देणारा वैचारिक सोहळा ठरला.




