रक्तदान करून गरजु रुग्णांचे प्राण वाचविणे म्हणजे त्यांना नवजीवन देणे होय :उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांचे प्रतिपादन. आलापल्लीत जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळाच्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

0
44

अहेरी:
रक्तदान हे जीवनदान असून त्यामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचविणे म्हणजे त्याला नवजीवन देणे असल्याचे प्रतिपादन अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी केले.
आलापल्ली येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेन्द्राचार्यजी महाराज रामानंदाचार्य दक्षिण पिठ नाणीज धाम रत्नागिरी यांचे श्री संप्रदाय भक्तसेवा मंडळ अहेरी, आलापल्लीच्या वतीने श्रीराम मंदिरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 51 रक्तदात्यानी रक्तदान केले.रक्तदान शिबीराचे उद्घघाटक अहेरी चे उपविभागीय पोलीसअधिकारी अजय कोकाटे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आलापल्ली वनविभागाचे उपवन संरक्षक राहुल टोलीया होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.कन्ना मडावी.आयटी आयटीआयचे कालेजचे व्हाईस प्रिंसीपल भांडारकर सर, केंद्र प्रमुख महेशजी मुकावार सर,साहाय्यक पोलीस निरीक्षक जिजा गुट्टे, एलआयसी डेव्हलपमेंट आफीसर मुनेश्वर हडपे,सेनि.प्रा.पद्भनाभ तुंडुलवार,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, अहेरी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे,श्री संप्रदायाचे जिल्हा सेवाध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, ब्लड प्रमुख आनंद पिपरे,व्यापारी संघटनेचे चंद्रकिशोर पांडे ,जिल्हा कर्नल लोमेश भांडेकर, संजय खरवडे,विवेक चेलेलवार,सखी मंच अध्यक्ष संगीता बुरांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमिला फरकाडे,,निर्मला उपलेंचवार, पल्लवी शेट्ये,सोनटक्के ,रेणु टिचकुले, वनिता खरवडे आरती सरोदे,यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.या रक्तदान शिबिरात अहेरी प्राणहिता कॅम्प मधील सिआरपिएफ बटालियन 37 च्या जवानासहीत, पोलिस कर्मचारी,आर्य वैश्य कोमटी समाज बांधव, व्यापारी वर्ग तथा विविध सामाजिक संघटनेनी व महीला संघटनेनी सहभाग नोंदविला व स्वेच्छेने रक्तदान केला.यामध्ये अहेरी,आलापल्ली,
नागेपल्ली ,व अन्य गावातील रक्तदात्यानी मोठ्या प्रमाणात रक्तदान केला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक व आभार रविन्द्र ठाकरे यांनी केले.