घरकुल मंजूर लाभार्थ्यांना तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनेअंतर्गत मंजूर बांधकामाकरिता रेती उपलब्ध करून द्या:महागाव(बु)चे उपसरपंच संजय अलोने यांची मागणी.

0
21

अहेरी:

ग्रामपंचायत महागाव(बु) अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना व विकासकामांसाठी रेती उपलब्ध करण्याची मागणी ग्रामपंचायत महागाव (बु) तर्फे तहसीलदार अहेरी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,ग्रामपंचायत महागांव बूज. प्राणहिता नदीच्या लगत महागांव बूज रेती घाट लिलाव मागील २ वर्षापासून झालेला नाही. केंद्र व राज्यशासन पुरस्कृत आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर बांधकाम मजूर असून रेती अभावी घरकुल बांधकाम तसेच ग्राम पंचायत स्तरावरील विविध योजने अंतर्गत मंजूर बांधकाम अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुल बांधकाम व ग्राम पंचायत स्तरावरील विविध योजने अंतर्गत मंजूर झालेले बांधकाम पूर्ण करण्यास प्रशासन स्तरावरून लाभार्थ्यांना स्वताचे घरकुल बांधकामासाठी व ग्राम पंचायतीस विविध योजना अंतर्गत बाधकाम पूर्ण करण्यास रेती/वाळू उपलब्ध करून देण्यात यावे.
यावेळी वांगेपली सरपंच दिलीप मडावी, सचिव अनिल बंडावार, बाबूराव मोहूर्ले, सचिन करमे, महागाव बूजचे उपसरपंच संजय अलोने, सदस्य लालू वेलादी, मनोज भोयर, अजय दुर्गे , एर्री पानेम, अजू पानेम आणि समस्त गावकरी बांधव आदींची उपस्थिती होती.