राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धेत, जिल्हा परिषद शाळा ईतलचेरू चा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक .

0
1

 

अहेरी:
गट साधन केंद्र अहेरी च्या वतीने मॉडेल स्कूल अहेरी च्या सभागृह आयोजित केलेल्या  राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धेत, सेंट फ्रान्सिस हायस्कूल नागेपल्ली
, राणी दुर्गावती हायस्कूल,आलापल्ली
,कस्तुरबा गांधी, हाय स्कूल इंदाराम
, भगवंतराव हाय स्कूल, अहेरी
, रिपब्लिक हाय स्कूल अहेरी,
 नवबौध्द शाळा, वांगेपल्ली
, मॉडेल स्कूल अहेरी , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ईतलचेरू अशा शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला ह्या स्पर्धेचे नाट्य सादरीकरणाचे विषय कृत्रीम बुद्धिमत्ता मित्र किंवा धोके, ईव्ही वाहने भविष्याचा पुढचा मार्ग,महासागरांचे संरक्षण,अंतराळातील लोकवस्ती असे होते. ह्यात प्रत्येक शाळेतील चमूत आठ विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येते. तीस मिनिटे सादरीकरणासाठी दिली जातात. या स्पर्धेतील जिल्हा परिषद शाळा ईतलचेरू एकमेव स्पर्धेक होती ज्यांनी ईव्ही वाहने भविष्याचा पुढचा मार्ग ह्यावर लघुनाट्य अतिशय प्रभावी सादरीकरण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. व नवबौध्द मुलांची शाळा वांगेपल्ली  द्वितीय क्रमांकावर राहिली. ह्यातील प्रथम क्रमांकाचे चमू हे जिल्हा स्तरावर भाग घेणार आहे. ह्या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट हे कलेतून विज्ञानाचे प्रचार- प्रसार व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण असुन भविष्याचा वेध घेणे आहे. सदर स्पर्धेचे परीक्षक हे सुनील खंडाळे , रुपेश सुनतकर , विशाल  चिलवेरवार  होते. सदर स्पर्धा ही सूरज वालस्कर, गट शिक्षणाधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनात पार पडली तर  अरुण जक्कोजवार तालुका उपक्रम प्रमुख यांनी नाट्य स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
गट साधन केंद्रातले सर्व साधन व्यक्ती
 सुषमा खराबे , ताराचंद भुरसे
दीपा रामटेके , प्रविणा कांबळे
या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी BRC कर्मचारी आणि मॉडेल स्कूल चे शिक्षकांनी सहकार्य केले विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले असून जिल्हा स्तरावर सहभागासाठी शुभेच्छा देण्यात आले.