नक्षलवादावर ‘अंतिम प्रहार’! गडचिरोली पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; ८ जहाल माओवाद्यांना बेड्या, ६५ लाखांची रोकड आणि ५१ शस्त्रे जप्त

0
7
  • एकूण जप्त अग्निशस्त्रे: ५१ (ज्यामध्ये ०२ एलएमजी रायफल, ०४ एके ४७ रायफल, ०४ एसएलआर रायफल, ०३ इन्सास रायफल, .३०३ रायफल, आणि १२ बोअर रायफल्सचा समावेश आहे).

  • दारूगोळा व इतर: मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे, मॅगझिन, बीजीएल लॉन्चर आणि डेटोनेटर्स.

  • रोख रक्कम: ६५ लाख ४४ हजार रुपये रोख जप्त (गुंडेणूर जंगलातून ६३ लाख ८४ हजार रुपये).

अटक करण्यात आलेले जहाल माओवादी आणि त्यांच्यावरील बक्षीस:

महाराष्ट्र शासनाने या आठही माओवाद्यांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अ.क्र.

माओवाद्याचे नाव व पद

दाखल गुन्हे

जाहीर बक्षीस

राजु उर्फ मंगदु वेको (DVCM, कंपनी क्र. १०)

२७ गुन्हे (१४ चकमक, ७ खून)

१६ लाख रुपये

ज्योती उर्फ अकिला पोटावी (DVCM, टेक्निकल)

गुन्ह्यांची पडताळणी सुरू

१६ लाख रुपये

जन्नी उर्फ नगी येमला (PPCM, कंपनी क्र. १०)

०६ गुन्हे (२ चकमक, ३ खून)

०८ लाख रुपये

जयराम मोंगे गावडे (PPCM, कंपनी क्र. १०)

२७ गुन्हे (११ चकमक, १४ खून)

०८ लाख रुपये

मुकेश उर्फ लच्छु अवलाम (बॉडीगार्ड)

०१ चकमकीचा गुन्हा

०४ लाख रुपये

विजय उर्फ मंगडू तामो (झोन टीडी सदस्य)

गुन्ह्यांची पडताळणी सुरू

०४ लाख रुपये

रजिता उर्फ शामबत्ती मडावी (सदस्य, कोअर दलम)

गुन्ह्यांची पडताळणी सुरू

०४ लाख रुपये

आमती उर्फ संध्या पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. १०)

०७ गुन्हे (४ चकमक, २ खून)

०४ लाख रुपये

नोंद: पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या ६ पैकी ५ माओवाद्यांना या कारवाईत अटक करण्यात आली, तर उर्वरित एक महिला माओवादी मोनी मडावी हिने विजापूर (छत्तीसगड) येथे आत्मसमर्पण केल्यामुळे आता गडचिरोली पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही.

या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई:

सदर ऐतिहासिक कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदिप पाटील, डीआयजी श्री. योगेश कुमार, सीआरपीएफ डीआयजी श्री. अजय कुमार शर्मा आणि एसपी श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक (प्राणहिता व गडचिरोली) च्या जवानांनी जीवाची बाजी लावून फत्ते केली.