कोटापल्ली येथील मय्यत परिवाराला तात्काळ आर्थिक सहाय्य; जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून पुन्हा सिद्ध
सिरोंचा (गडचिरोली):नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे नेतृत्व, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता दाखवली आहे. सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली गावातील रहिवासी स्व. बानय्या दुर्गम यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी तात्काळ आर्थिक मदत पाठवून या संकटग्रस्त परिवाराला मोठा आधार दिला आहे.
माहिती मिळताच वेळेचा विलंब न करता पोहोचवली मदत
कोटापल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भाजपा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष सुरेश मडावी यांनी स्व. बानय्या दुर्गम यांच्या निधनाची माहिती माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजे साहेबांनी कोणताही विलंब न करता तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मय्यत परिवारासाठी आर्थिक मदत रवाना केली.
दुर्गम परिवाराकडून कृतज्ञता व्यक्त
राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी पाठवलेली ही मदत स्व. बानय्या दुर्गम यांच्या पत्नी चंद्रक्का दुर्गम व मुलगा किरण दुर्गम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. अत्यंत कठीण आणि दुःखाच्या प्रसंगी राजे साहेबांनी दाखवलेल्या या देवदूतासारख्या सहकार्याबद्दल दुर्गम परिवाराने व ग्रामस्थांनी अत्यंत भाऊक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
ही मदत सुपूर्द करताना सिरोंचा भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, उपसरपंच सुरेश मडावी, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष श्रीनिवास चिलकामारी, गगन पोलमपल्ली, राकेश येबरी, संतोष यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेशी असलेले नाते केले अधिक दृढ!
अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात देणे आणि त्यांच्या सुखापेक्षा दुःखात आधी धावून जाणे, ही अहेरी राजघराण्याची परंपरा राहिली आहे. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी या संकटसमयी दुर्गम परिवाराला दिलेल्या दिलाशामुळे, त्यांनी जनतेशी असलेले आपले कौटुंबिक नाते अधिक दृढ केल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.




