अहेरी:
भारतीय एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिन) तसेच पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून, जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) प्राणहिता येथील बटालियन 9 व बटालियन 37 तर्फे भव्य **’रन फॉर युनिटी – मॅरेथॉन’**चे आयोजन करण्यात आले. यावर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
शंभू कुमार, कमांडंट, बटालियन 9 आणि दव किंडो, कमांडंट, बटालियन 37 यांच्या मार्गदर्शनाखाली या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संविधानात्मक मूल्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनला कमांडंट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
प्राणहिता अहेरी येथील सीआरपीएफ मुख्यालयापासून एस.बी. कॉलेजपर्यंत ही ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (
सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी, श्री शम्भू कुमार कमांडंट, ९ बटालियन, श्री दाओ किंडों कमांडंट, ३७ बटालियन, डॉ. दीप मोहन, सी.एम.ओ., ९ बटालियन, श्री योगेन्द्र ढकोले, २आयसी, ९ बटालियन, श्री शिवा कुमार, २आयसी, ३७ बटालियन, आणि श्री महेंद्र कुमार, ए.सी., ९ बटालियन यांची प्रमुख उपस्थिती होती.
31 ऑक्टोबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व, सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या एकीकरणातील योगदान आणि नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.




