तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना सातबारा द्या.

0
1

महसुल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन..

अहेरी :

अहेरी तालुक्यातील मौजा – तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कसमपल्ली मसाद या नावाने शेतीचे सातबारा देण्यासंदर्भात *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच -बालाजी गावडे*  यांनी *महाराष्ट्राचे महसुल मंत्री, मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे*  यांना निवेदन देण्यात आला. यावेळी *गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री – मा.ना. ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी – मा. अविश्यांत पंडा*  सह गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
        यावेळी निवेदनात म्हटले की, अहेरी तालुका मधील तलाठी साझा मेडपल्ली व ग्रामपंचायत कार्यालय मेडपल्ली अंतर्गत येणारा मौजा – तुमिरकसा हे गाव महसूल विभागाचा नोंदणी मध्ये कसमपल्ली मसाद या नावाने नोंद आहे. आणि सन – २०२०-२१ या वर्षापर्यंत तलाठी मेडपल्ली कडून मौजा – तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कसमपल्ली मसाद नावाने शेतीचे अस्तलिखित सातबारा सुद्धा दिले.
       परंतु सन – २०२१ नंतर महसूल विभाग व तलाठी मेडपल्ली कडून मौजा – तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना अचानक अस्तलिखित किंवा ऑनलाईन या पैकी कोणत्याच प्रकारच्या सातबारा हे तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना सातबारा दिले नाही/ सातबारा देणे बंद केले आहे.
         त्यामुळे मौजा – तुमिरकसा गावातील सर्व शेतकऱ्यांचा खुप नुकसान होत आहे, त्या शेतकऱ्यांना सातबारा ना मिळाल्यामुळे शासनाचा कोणत्या प्रकारचा सवलत मिळत नाही. आणि तुमिरकसा गावातील नागरिकांनी त्यांचे अत्यावश्यक कागदपत्रे कळण्यासाठी सुद्धा शेतीचे सातबारा जोडावा लागतो परंतु सातबारा नसल्यामुळे कागदपत्रे सुद्धा काढू शकत नाही.
       म्हणुन आपण महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री या नात्याने त्वरीत आपण सबंधित अधिकाऱ्यांना आदेश देवून मौजा – तुमिरकसा गावातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे शेतीचे सातबारा हे कसमपल्ली मसाद या नावाने सातबारा देण्यात यावे. जेणेकरून मौजा – तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना शासनाचा विविध योजनेंचा लाभ मिळू शकेल आणि त्यांचे सर्व अत्यावश्यक कागदपत्रे काढू शकतील असे निवेदनात म्हटले आहे.
         यावेळी महसुल मंत्री यांना निवेदन देतांना – *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – बाबुराव तलांडी, सामाजिक कार्यकर्ता – साईनाथ कांदो*  उपस्थित होते.