भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात अहेरीत राष्ट्रवादी(श. प )चे आंदोलन..

0
1

अहेरी:20सप्टेंबर.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अहेरी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन नागपूर विभागीय महिला अध्यक्षा शाहीन हकीम यांच्या नेतृत्वाखाली अहेरीच्या मुख्य चौकात झाले. या आंदोलनादरम्यान, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “ज्येष्ठ नेत्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
शाहीन हकीम यांनी म्हटले आहे की, जयंत पाटील हे राज्याचे अभिमान आहेत आणि त्यांच्यावर केलेली टीका संतापजनक आहे. अशा प्रकारची वक्तव्ये पुन्हा केली गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात अनेक कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निषेधामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

         यावेळी कार्यक्रमाला जहिरुद्दीन भैया हकीम, श्रीनिवास विरगुनवार ,अमोल मुक्कावार ,सलया कंबलवार अब्दुल हुसेन ,श्रीनिवास चटारे संतोष येमुलवार ,सुमित मोतकुरवार , शंकर कटलावार मिलींद अलोणे ,शैलेश गेडाम मोनु पारेलीवार ,अनुराग बेजेलवार ,शाहरुख शेख ,आदिल सायद ,अरमान शेख, ज्ञानकुमारी कौशी, गीताबाई दुर्गे ,सुरभी राव समृद्धी चिमड्यलवार ,हीना सुनतकर ,पोर्णिमा पुंगाटी, रंजना कौशी ,छाया तालांडे ,कविता तलांडे ,संद्या मूगमोडे ,जयश्री चिललेवार ,शैला पठाण ,समीना शेख ,तजिना शेख महिला, युवक व ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.