स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत चारचाकी वाहनासह 14लाखांची अवैध दारू जप्त.

0
236

गडचिरोली:
चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक करतांना सापळा रचून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व चारचाकी वाहन जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान मूलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली नजीक स्थानिक गुन्हे शाखेनी केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चंद्रपूर मूलचेरा एटापल्ली मार्गे चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने
कोपरअल्ली गावानजीक सापळा रचला.
, रात्री 12.00 वा दरम्यान एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन अडविण्याचे कारण सांगून वाहनाची तपासणी केली.
वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध विदेशी दारू व बिअरचे 143 पेटी किंमत अंदाजे 14,00,400/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन क्र. एम. एच. 33 टी 5095 किंमत अंदाजे 7,00,000/- रु. असा एकुण 21,00,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे मुलचेरा येथे कलम 65 (अ) व 98 (2) महा. दा. का. अन्वये इसम मनोज मजुमदार वय 45 वर्ष रा. ता. एटापल्ली. जि. गडचिरोली याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी देखील पोस्टे गडचिरोली येथे अवैध दारुच्या बेकायदेशीर वाहतूकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्री. श्रेणिक लोढा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/गरफडे, पोअं/करमे आणि चापोअं/निसार यांनी पार पाडली.