अहेरी:
भारतीय जनता पार्टी तर्फे 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यत देशभरात सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून आज 5 जानेवारी ला विशेष सदस्यता मोहीम राबविण्यात येत असून वरिष्ठ पातळीवरून अहेरी विधानसभा क्षेत्राचे पालक म्हणून माजी नियुक्ती करण्यात आली आहे.आज सकाळपासूनच आलापल्ली येथे विविध वर्गातील नागरिकांची सद्स्य म्हणून नोंदणी केली आहे. आज अहेरी विधानसभा क्षेत्रात दहा हजार सदस्य नोंदणी झाल्याची माहिती भाजपाचे अनुसूचित जमाती आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी खा. अशोक नेते यांनी आलापल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या वेळी 15 कोटींच्या वर सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे.सदस्य नोंदणी साठी स्मार्ट फोन च्या माध्यमातून नंबर डायल करून मिस कॉल देऊन मोबाईल वर संदेश येईल आलेल्या लिंक मध्ये आपली संपूर्ण माहिती भरून सदस्यता घेता येणार आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ वर कार्यकत्यांची बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात सदस्यता नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही त्या ठिकाणी कार्यकत्यां मार्फत ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून सदस्यता नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती नेते यांनी दिली.एकूणच कार्यकत्यामार्फत मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी चे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल बाबूराव कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कनपल्लीवार,मच्छिमार सेल अध्यक्ष मोहन मदने , जिल्हा सचिव पोशालू सुधरी ,तालुका महामंत्री अभिजित शेंडे,सुकमल हलदार,अंकुश शेंडे, हर्षीत वर्मा ,सागर बांबोळे आदींची उपस्थिती होती.




