अहेरी:
विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेतील केंद्रबिंदू मानून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविणारे मूलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली येथील शिक्षक दिवाकर मादेशी यांना
जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठाण, तालुका- वैजापूर, जिल्हा- संभाजीनगर कडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून अध्यापन करतांना देणारे कार्याची दखल घेऊन मादेशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याची अभिनव पद्धत,एक दिवस दप्तरमुक्त शाळा आदी.सह अनेक उपक्रमामुळे मादेशी विद्यार्थी वर्गात लोकप्रिय ठरले आहेत.
आंबटपल्ली येथील शाळेत सुरू असलेल्या उपक्रम जीवन शिक्षण मासिकेत प्रकाशित झाल्यावर राज्यस्तरावरून त्यांना अनेक शिक्षकांचे पसंतीपर अभिप्राय आले आहेत.
त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




