गडचिरोली:.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आहे.मतदार राजाचा कौल येण्यास अवघे काही दिवस उरले असतांनाच अहेरी विधानसभा क्षेत्रात जुन्या कार्यकत्यांनी माजी पालकमंत्री अंबरीश राव यांची साथ सोडत कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री अंबरीश राव यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अहेरी येथील प्रभाग क्रमांक 7 मधील
शेखर येमुलवार ,प्रवीण रामगिरवार ,सुनील येमुलवार,संतोष आईलवार ,विलास मुनुरवार ,नरेश इप्पावार रवी इप्पावार,राजू रामगिरवार ,साई सिल्मुलवार आदी.नी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.सर्व कार्यकर्त्यांचे दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.
कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या विकासकामावर त्यांना पुढे घेऊन जाण्याचा विश्वास दर्शवून आगामी काळात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनीं केला आहे.




