जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा :खा. सुप्रिया सुळे यांची आल्लापल्लीत भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारार्थ सभा.

0
772

अहेरी:
राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आणि वेदना आहेत .राज्यातील कुटूंबातील लेंकीवर अन्याय,अत्याचाराचे सत्र सुरू असून त्यांसाठी न्याय व हक्कासाठी महायुती सरकारला हद्दपार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी आल्लापल्ली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारसभेत केले.

शून्यातून निर्माण केलेला शरद पवार यांचा पक्ष पळविला त्यांचे चिन्हही पळविले .राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा पक्ष नाही व चिन्हही नाही .त्यामुळे पवार साहेबांचा विश्वासघात करण्याऱ्याना जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलतांना त्या म्हणाला, भाग्यश्री आत्राम ह्या दडपशाही विरुद्ध ताकतीने लढत आहेत. त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी या लेकीला शक्ती देण्यासाठी विधानसभेत आमदार बनवून पाठवा त्यांच्या पाठीशी आम्ही ताकतीने उभे आहो.असे आवाहन त्यांनी केले.चांगले रस्ते,शुद्ध पाणी पुरवठा,24 तास वीज ,समाजातील सर्व घटकांना न्याय,सेवा पाहिजे असेल तर भाग्यश्री आत्राम यांना विजयी करा. महिलेला सक्षमीकरण करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजने मार्फत प्रत्येक महिलेला 3000 रु देण्यात येतील.निर्भय वातावरण फिरण्यासाठी मोकळे जंगल हवे असते मात्र या ठिकाणी पर्यावरणाला धोका पोहोचवून प्रकल्प राबविण्यात येत आहे त्यामुळे जंगलाची हानी होते आहे.त्यामुळे येथील जल,जंगल राखणारा आदिवासी संकटात सापडला आहे.त्यासोबत च सुरजागड खान प्रकल्पात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे, त्यासोबत येथील माल बाहेर जाणार नाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या क्षेत्रात उभारण्यात येईल.बंगाली समाजाला इ.डब्लू एस प्रवर्गात आरक्षण,जमिनीचे पट्टे देतांना गैरआदिवासींना तीन पिढीच्या अटींत शिथिलता देऊन त्यांना पट्टे मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार.कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना माहाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

उमेदवार भाग्यश्री आत्राम म्हणाल्या,विद्यमान मंत्री त्यांच्या आघाडीतील बंडखोरी बद्दल बोलत नाहीत.काका आणि पुतण्या एकच आहेत.आपल्या सभेत विद्यमान मंत्री आपल्या मुलींवरच म्हणजे माझ्यावर जहरी टीका करतात.कारण त्यांची विचारधारा बदलली आहे त्याला मी विरोध केला .आज त्यांच्या भोवती भांडवलदारांचे जमावडा झाला आहे.त्यामुळे ते जनतेचे हित विसरले आहेत.
त्यांच्या साठी आज लाडकी मुलगी परकी झाली या प्रवृत्ती विरोधात मी रणशिंग फुंकले आहे त्या साठी जनतेची साथ हवी आहे.


जनतेच्या हितासाठी मी राजपरीवार,वडिलांचे घरदार सोडून बाहेर पडली आहे .येथील जनसामान्य लोकांचे कल्याण हेच माझे लक्ष्य आहे.माझ्यात राणी दुर्गावती चे रक्त असून मी लढणार आहे त्या साठी तुमची साथ हवी असल्याचे उमेदवार भाग्यश्री आत्राम म्हणाला.
यावेळी मंचावर खा.नामदेव किरसान, महिला आघाडीच्या शाहीन हकीम,प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,ऍड.अंजली साळवे,सुरेश गुलधे पाटील,अरुण धुर्वे,सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष निसार हकीम आदींची उपस्थिती होती.