अहेरी :
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे.प्रचारासाठी आता फक्त अवघे काही दिवसच शिल्लक उरले आहे .त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी विविध माध्यमांद्वारे मतदारराजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.प्रचार रथ, कलापथकाद्वारे नृत्य व गाण्यातून प्रचार करून मतदार राजाला साद घातली जात आहे.त्यासोबत काही उमेदवार फोटो सह मोठा बलूनलावून लक्ष वेधत आहे.एल ई डी स्क्रीन वर विकासकामांची माहिती दाखवून मतदार राजाला साद घातली जात आहे .
यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रात महिला आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भाग्यश्री ताई आत्राम यांना संधी द्यावी यासाठी कार्यकर्ते घरोघरी पोहोचुन जनतेला साद घालतांना दिसत आहे .अहेरी आलापल्ली शहरातील विविध भागात गल्ली बोळात भाग्यश्री ताईंचे निवडणूक चिन्ह तुतारी पोहोचवण्यासाठी आल्लापल्ली ग्रा. पं सदस्य स्वप्निल श्रीरामवार सह पक्षाच्या सदस्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता ‘डोअर टू डोअर’ जात आहेत .या प्रचारात सहभाग घेऊन पॅाम्प्लेटचे वाटप केले.
आलापल्ली येथील एटापल्ली रोड वरील गोलकर मोहल्ला, श्रीकृष्ण मंदिर ,साई मंदिर, श्रमिक नगर,गोंडमोहल्ला, श्रीराम चौक ,बजरंग चौक ,वनवसाहत आदी.विविध भागात भाग्यश्रीताई आत्राम यांच्या प्रचारार्थ डोर-टू -डोर प्रचार करण्यात आला.
यावेळी महिला कार्यकर्त्यांचा ही लक्षणीय सहभाग होता.
घरोघरी चालणाऱ्या प्रचाराने सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आहे.




