अहेरीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव मोठ्या उत्सवात संपन्न
अहेरी :-
राजनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहेरीनगरात 250 वर्षापासून दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले तसेच विविध कार्यक्रम यावेळी पार पडले आहे.
यावेळी जनसमुदायाला संबोधित करतांना राजे अंबरीश राव यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले, अहेरी विधानसभा मागील पाच वर्षात विकासा पासून दूर झाले आहे. विद्यमान मंत्री हे स्वतःचा विकास करण्यात मग्न आहे मात्र जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही पैसा आणि यंत्रणा कोणतीही ताकद लावा. ..जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही. अहेरीतील प्रसिद्ध दसरा महोत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विरोधकांना सज्जड ईशारा दिला.
साध्या अहेरीतील रस्ते करू शकले नाही मग मंत्री राहून काय केलेत.
वडील आणि मुलीत फॅमिली ड्रामा सुरु आहे त्या ड्रामात जनतेने फ़सू नये.
सत्तेचे व पैश्याचा आमिष खुप झाले आहे.
कोणीही जिंकून आले की, सत्ता घरीच राहते. या विचाराने हा ड्रामा खुप चालले आहे मात्र जनता हुशार झाली असून तुम्हाला ओळखली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखविणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नेत्यांनी जनसंपर्क वाढविन्यास सुरुवात केली असून,माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांनी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबांना लक्ष केले असून,मंत्री महोदय जनतेला खड्डयात घालून हेलिकॉप्टरने दौरा करीत आहेत. अहेरी विधानसभेत रस्ते,वीज, पाणी, रोजगार या मुद्द्यांवर विद्यमान मंत्री महोदयांनी काहीही केले नाही.जनतेच्या नजरेतुन उतरलेले आता हे स्वतःलाच” दिलो का राजा” म्हणून चित्रपट काढून आपली प्रतिमा उजळवीण्याचा प्रयत्न करीत आहेत.बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांना जनता आता चांगला धडा शिकविणार असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
सुरजागड कंपनी, कंपनी दलाल व धर्मराव बाबा यांनी कितीही पैसे वाटा, सर्व यंत्रणा लावा माझी चॅलेंज आहे या वेळी जनता मला आशीर्वाद देणार आहे. असे घणाघाती दसऱ्याच्या मंचावरून श्रीमंत राजे अंब्रीशराव महाराज यांनी केले.
या दसऱ्या महोत्सवला जवडपास 55-60 हजार क्षेत्रातील राजेंचे चाहतेसह जनतेने हजेरी लावली. हे दसरा मागील पाच वर्षातून मोठा दसरा महोत्सव मानला जात आहे.
रात्रभर आदिवासी बांधवांचे नृत्य सुरु होते. यात राजे सहित राजपरिवाराचे सदस्य सुद्धा सहभागी झाले. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राजमहालात पानसुपारी वाटपाचा कार्यक्रम पार पडला आणि दसरा उत्सवाची सांगता झाली.




