मिलिंद खोंड.
अहेरी ही राजनगरी म्हटली जाते..जिल्ह्याचे राजकारण या ठिकाणाहूनच चालते त्यामुळे अहेरी ला जिल्ह्याच्या राजकारणात अन्यनसाधारण महत्त्व आहे.अहेरी राजनगरी तील दसरा महोत्सव देशभरात विख्यात आहे.अहेरी इस्टेटचे राजे अंबरीश राव यांची पालखी गावभरात फिरते त्यानंतर ते नागरिकांना संबोधित करतात त्यांचे आजच्या संबोधना कडे जनतेचे लक्ष लागलेले आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते आज काय संबोधन करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तलावावर अचूक निशाणा साधतांना
राजेंचा यावेळी तरी निशाणा अचूक राहील काय?ते कोणा कोणाला लक्ष बनवितात?त्यासोबतच हा निशाणा साधतांना ते विधानसभेचे लक्ष्य पार करतील काय??त्यासाठी त्यांना आपल्या काका-चुलती सोबतच मुकाबला करावा लागणार आहे.त्यामुळे त्यांची लढाई काट्याची राहणार आहे ती कशी पार करतात याकडे लक्ष लागले आहे. मागील वेळी निशाणा थोडक्यात हुकला होता त्यावेळी मोटा भाई चा फायदा राजेंना कॅश करता आला नाही .आता यावेळी सावध राहून राजेंनी यावेळी तरी अचूक नेम साधून विधानसभेचे लक्ष गाठावे अशी जनतेची अपेक्षा आहे.त्यासाठी त्यांना कमळावर स्वार होण्याची आशा धूसर असली तरी तुतारी हाती घ्यावी लागली तरी बेहत्तर आहे.मात्रअंतिम पर्याय शेवटी राजेंच्या हाती आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ह्या विधानसभा क्षेत्रावर काही अपवाद वगळता राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून राजनगरी अहेरी राहिली आहे.यावेळी विधानसभा निवडणुकीत बाप-लेकीच्या लढतीच्या शक्यतेने राज्याचे लक्ष या विधानसभेकडे लागले आहे.
भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, मुलगा-वडील, भाऊ-बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अशा अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत.पण येत्या विधानसभेत महाराष्ट्राला पहिल्यांदाच बाप-लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ही राजकीय लढाई असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामधली. कारण, धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड केलं असून मागील आठवड्यात अहेरीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख व ईतर नेत्यांच्या उपस्थिती मध्ये तुतारी हाती घेतली आहे.त्यामुळे येत्या काळात इथे बाप-लेक-पुतण्या असा राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे.
त्यासोबतच जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाग्यश्री आत्राम हिला विधानसभेची उमेदवारी मिळाली तर ,त्या आपले वडील धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान देतील. राज्यात पहिल्यांदाच बाप-लेकी मधील लढत बघायला मिळेल.
भाग्यश्री आत्राम गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष,बांधकाम सभापती हे पद भूषविले असुन सदयस्थीतीत त्या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या आहेत. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी व अनुभव असल्यामुळे त्या आपले वडील व चुलत भावासमोर मोठे आव्हान उभे करू शकतात.
जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे त्याबरोबर काका-पुतण्या मध्ये वाकयुद्ध रंगत जात आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी यानिमित्ताने होतांना दिसत आहे.
महायुतीचा भाजप-शिवसेना-(शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) घटक पक्ष आहे.विद्यमान आमदाराला तिकिटाचे धोरण महायुतीने राबविल्यास कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना येथील उमेदवारी जाणार.त्यावेळी माजी पालकमंत्री अंबरीश राव यांच्या समोर मोठा पेच उभा राहणार आहे.त्यावेळी त्यांचे पुतणे भाजप नेते, माजी पालकमंत्री अंबरीश राव यांच्यापुढे आपला वेगळा झेंडा घेऊन लढण्याशिवाय पर्याय नसेल.स्वतंत्र लढण्याचा आपला मार्ग मोकळा असल्याचा अशी कार्यकत्याची ईच्छा असल्याचा मनोदय त्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलून दाखविला आहे.त्यामुळे ते महायुती विरुद्ध बंडाचा झेंडा उचलतात काय?हे येणारा काळच स्पष्ट करेल.हे बघणे रंजक ठरणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नेत्यांनी जनसंपर्क वाढविन्यास सुरुवात केली असून,माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांनी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबांना लक्ष केले असून,मंत्री महोदय जनतेला खड्डयात घालून हेलिकॉप्टरने दौरा करीत आहेत. अहेरी विधानसभेत रस्ते,वीज, पाणी, रोजगार या मुद्द्यांवर विद्यमान मंत्री महोदयांनी काहीही केले नाही.जनतेच्या नजरेतुन उतरलेले आता हे स्वतःलाच” दिलो का राजा” म्हणून चित्रपट काढून आपली प्रतिमा उजळवीण्याचा प्रयत्न करीत आहेत.बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांना जनता आता चांगला धडा शिकविणार असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
या टिकेवर लगेच पलटवार करीत मध्ये धर्मराव बाबा यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे,गेली चार वर्षापासून तुमचा थांगपत्ता नव्हता. आज निवडणूका तोंडावर आले असतानाच समस्या कसे दिसत आहेत ? असा खोचक सवाल करत घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये अश्या शब्दात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अम्ब्रीशराव आत्रामांवर हल्लाबोल केला.एटापल्ली तालुक्यातील पीपली बुर्गी येथे आयोजित जनसंवाद व आढावा बैठक दरम्यान ते बोलत होते.हेलिकॉप्टरने फिरून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात आहे.मात्र, तुमच्याकडे आलेल्या लोकांना भेटायला तुम्हाला वेळ नाही.एकीकडे स्वतः कधी मतदारसंघात उपस्थित राहत नाही आणि वर्षातून एकदा कधी आले तर दिवसा कुणाला भेटत नाही.त्यामुळे अनेकांनी साथ सोडली. आता पुन्हा सक्रिय झाल्याचे दाखवीत आहेत. मात्र,जनता खूप हुशार आहे.तुमची जागा तुम्हाला नक्कीच दाखविणार आहे. आम्ही विकास कामांचा कधीच गवगवा केला नाही.अजूनही कोट्यवाधिंची कामे प्रगतीपथावर आहेत.पावसामुळे रस्त्यांची कामे थांबली होती.आता पूर्वव्रत सुरू झाले आहे.जो काम करतो त्याच्यासमोरच समस्या येतात.ज्या माणसाने कधी कामच केले नाही त्यांना समस्यांची काय जाणीव असेल.असा टोला देखील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी लगावला.
त्यामुळे येत्या काळात पुन्हा बाप-लेक आणि पुतण्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहे.यानिमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्र पुन्हा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहील हे नक्की..




