एटापल्ली:14फेब्रुवारी
एटापल्ली तालुक्यात मृत्यूचा सापळा बनलेल्या मुख्य रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनासमोर अखेर प्रशासन झुकले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी आणि आमरण उपोषणाची दखल घेत, प्रशासनाने रस्ते कामांना जिल्हा खनिज निधी (DMF) मधून मंजुरी देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या विजयानंतर आज, १४ फेब्रुवारी रोजी पत्रकारांनी आपले उपोषण मागे घेतले.आंदोलनाचा घटनाक्रम आणि प्रशासकीय हालचालीएटापल्ली तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या तीन प्रमुख मार्गांची अवस्था दयनीय झाली होती. खड्डे आणि धुळीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते:
९ फेब्रुवारी: रवी रामगुंडेवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात.
१३ फेब्रुवारी: प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आमरण उपोषणाची घोषणा.
१४ फेब्रुवारी: जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर उपोषणाची सांगता.या प्रमुख रस्त्यांचा मार्ग झाला मोकळाप्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील तीन महत्त्वाच्या रस्त्यांचे भाग्य आता उजळणार आहे:१. एटापल्ली – देवदा – गडचिरोली (राम-३५)२. एटापल्ली – जारावंडी रस्ता (राम-३६)३. एटापल्ली – हेडरी – गट्टा रस्ता (राम-३५)
“प्रशासकीय स्तरावर कामांचे नियोजन पूर्ण झाले असून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या कामांना अंतिम प्रशासकीय मान्यता दिली जाईल. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.”
— अमर राऊत (IAS), उपविभागीय अधिकारी, एटापल्ली
जनशक्ती आणि पत्रकारितेचा विजय
या आंदोलनाला तालुक्यातील नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी अभूतपूर्व पाठिंबा दिला. ‘ अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने संपूर्ण तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, आता हे काम किती दर्जेदार होते आणि प्रत्यक्ष यंत्रणा कधी रस्त्यावर उतरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




