उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्रींचे निधन!
• दक्षिण गडचिरोलीवर शोककळा!
अहेरी:28ऑक्टोबर
डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्री रुको बाई डोबी मडावी (९५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन!
उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्री रुको बाई डोबी मडावी यांचे वृद्धापकाळातील आजाराने आज, मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे दक्षिण गडचिरोलीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, दुःखाचे वातावरण आहे.
रुको बाई मडावी यांच्या पोटी डॉ. कन्ना मडावी यांच्या रूपाने एक समाजपयोगी आणि कर्तव्यदक्ष पुत्र जन्माला आला, ज्यांनी वैद्यकीय सेवेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मडावी कुटुंबावर आणि परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
• माजी मंत्र्यांकडून सांत्वन!
ही दुःखद बातमी मिळताच, अहेरी इस्टेटचे श्रीमंत राजे अंबरीशराव आत्राम, माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने डॉ. कन्ना मडावी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी दिवंगत रुको बाई डोबी मडावी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आणि डॉ. कन्ना मडावी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी व्यक्त केल्या तीव्र संवेदना!
याचवेळी गडचिरोलीचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ देवराव होळी यांनीही सांत्वना भेट देऊन अंतिम दर्शन घेतले आणि मडावी परिवाराला दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना केली.
यावेळी कुमार अवधेशराव बाबा आत्राम उपस्थित होते.
(बॉक्स)
श्रद्धांजली:
“रुको बाई डोबी मडावी यांच्या निधनामुळे मडावी कुटुंबाची झालेली हानी मोठी आहे. त्यांच्या संस्कारातूनच डॉ. कन्ना मडावी यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि समर्पित डॉक्टर समाजाला मिळाला. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण मडावी कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत राजे अंबरीशराव आत्राम यांनी आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या.
दक्षिण गडचिरोलीतील सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.




