आलापल्ली वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचे मार्ग सुकर *भूमी अभिलेख उपसंचालक मिसाळ अहेरीत दाखल.

0
3

अहेरी :-26सप्टेंबर
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले आलापल्ली वासियांचे प्रॉपर्टी कार्डचे (मालकी हक्क)प्रश्न निकाली व मार्गी लागणार असून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना व पाठवपुराव्याला यश येत असल्याचे संकेत दिसत आहे.
गुरुवार 25 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख नागपूरचे उपसंचालक लालसिंग मिसाळ अहेरी येथे दाखल होऊन अपीलार्थीचे सुनावणी घेतले. जवळपास 76 आपिलार्थी सुनावणीत हजर होते. सुनावणी दरम्यान लवकरच आलापल्ली वासियांचे प्रॉपर्टी कार्ड सबंधीचे निकाल निकाली काढण्याचे व प्रॉपर्टी कार्ड (मालकी हक्क) प्रदान करण्याचे भूमी अभिलेख उपसंचालक लालसिंग मिसाळ यांनी आश्वासन दिले.
यावेळी अहेरीचे भूमीअभिलेख उपअधीक्षक गुणवंत रणदिवे, आलापल्लीचे तलाठी एकनाथ टपाले, आलापल्लीचे वनपरिक्षेत्रधिकारि गौरव गणवीर, वनपाल पूनमचंद बुद्धावार, वनरक्षक हरीश दहागावकर आदी अधिकारी, कर्मचारी हजर होते.