विधानसभा निवडणुकीत भाजप कडून झालेल्या बंडखोरीची अहेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून परतफेड. अहेरी नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला धक्का..

0
376

अहेरी:-राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटानी विधानसभा निवडणुक एकत्र लढवत सत्ता स्थापन केली.3 पक्ष सत्तेत असल्याने ठिकठिकाणी अंतर्गत लाथाळ्याचा फटका महायुतीच्या कार्यकत्याना बसत आहे.विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम असताना प्रचार करताना भाजप मध्ये दोन मतप्रवाह होते.माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव महाराज यांच्या पाठीशी एक गट होता त्यांनी बंडखोरी करत राहिली विधानसभा लढवली . त्यामुळे विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेसने अहेरी नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीत केली आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
युती मध्ये तिसरा भिडू येऊन महायुती बनली. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सत्तेत सामावून घेण्यात आले तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. परंतू भाजपची सत्ता येऊनही भाजपच्या पदाधिकारी व निर्वाचीत पदाधिकार्‍यांना कवडीचा ऊपयोग झाला नव्हता ऊलट वारंवार भाजपच्या कार्यकर्त्यांचे खच्चिकरणच सुरु होते. कामांचे नियोजन त्यावेळेस धर्मरावबाबांचे कूटूंबीयच बघायचे ज्यांनी आता वेगळी चुल मांडली असल्याचे दाखविले जात आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांना वेळोवेळी डावलल्या गेल्याची खंत पदाधिकारी व्यक्त करत असतात. अहेरी नगरपंचायतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे परंतू अजय कंकडालवार गटाने म्हणजेच काँग्रेसने वेगवेगळ्या गटांना एकत्र करुन सत्ता बसविली. महायुती स्थापन झाल्यानंतर भाजपशी जुळवून घेत महायुतीची सत्ता स्थापण करता आली असती परंतू राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासुन दुर ठेवण्याचेच काम केले. अपात्रतेच्या प्रकरणाच्या भितीने बर्‍याच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तेव्हा संख्याबळानुसार भाजप सोबत सत्ता स्थापन करणे अधिक सोपे झाले होते परंतू तसे झाले नाही. आज सभापती पदाच्या निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीने पुन्हा तीच खेळी खेळली आणि भाजपच्या पदरात एकही सभापती पद पडू नये असे समिकरण बनवुन युतीधर्माशी दगा केला.

*राष्ट्रवादीत खरेच दोन गट आहेत काय?*

अजित पवार वेगळे होण्यापुर्वीच अहेरी नगरपंचायतीत राष्ट्रवादी फुटली होती आणि एका गटाने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. फुटीर गटामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला मान्यता मिळाली नव्हती.

तिन वर्षांपासुन फूटून असलेले गट आज जेव्हा राज्यात राष्ट्रवादीचे तुकडे झाले परंतु नगरपंचायत मध्ये आत्ता दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन एकाच गटाची मान्यता घेतली. याचा अर्थ राष्ट्रवादीचे तुकडे झाल्याचे दाखवणे हा फार्स आहे अशी चर्चा नागरीकात सुरु आहे.एकतर दोन्ही गटाच्या नेत्यांचे आतुन साटेलोटे आहे किंवा सदर नगरसेवक आपआपल्या नेत्यांची दिशाभुल करत आहेत अशी चर्चा आहे.