गडचिरोली:
01 डी.व्हि.सी.एम., 01 ए.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य अशा एकुण 04 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे.
अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर, डी.व्हि.सी.एम टेक्नीकल टीम, वय 63 वर्षे, रा. अर्कापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, वनिता दोहे झोरे, एसीएम टेक्नीकल टीम, वय 54 वर्षे, रा. कोरनार, ता. एटापल्ली. जि. गडचिरोली, साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर, प्लाटून-32 सदस्य, वय 30 वर्षे रा. तुमरकोडी, ता. भामरागड जि. गडचिरोली व मुन्नी पोदीया कोरसा, पार्टी सदस्य, वय 25 वर्षे, रा. सिलीगेंर ता. कोळा, जि. सुकमा (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
अशोक सडमेक हा 1991 मध्ये नक्षल चळवळीत भरती होऊन एसीएम,चामोर्शी व अहेरी दलम कमांडर ,डिव्ही सीएम आदी पद सांभाळले आहे.सोबतच टेक्निकल टीम ची जबाबदारी सांभाळत होता.आजपर्यंत एकुण त्याच्यावर 82 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 31 चकमक, 17 जाळपोळ, व 34-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.वनिता झोरे ही 1993 मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती होऊन कमांडर,जनताना शाळेत शिक्षक एसीएम पदावर कार्यरत होती. वनिता दोहे झोरे हिच्यावर आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01- चकमक, 02- जाळपोळ, व 08- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर हा 2011 मध्ये भामरागड दलम मध्ये सामील होऊन भास्कर हिचामी चा अंगरक्षक म्हणून होता.
याच्यावर आजपर्यंत एकुण 04 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02- चकमक व 02- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
मुन्नी पोदीया कोरसा 2015 मध्ये बासागुडा दलममध्ये भरती होऊन सप्लाय टीम मध्ये कार्यरत होती. 2021 मध्ये माड डिव्हिजन मध्ये बदली होवून जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून आजपर्यंत काम केले.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 695 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.




