अहेरी:
आलापल्ली शहरात स्थानिक श्रीराम मंदिर येथे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 125 वी जयंती कापेवार-बेलदार समाज आलापल्ली, नागेंपल्ली व मद्दीगुडम समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांच्या वतीने आल्लापल्ली गावात रॅली काढण्यात आली.
श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट राजेंद्र प्रसाद मेंगणवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव रालबंडीवार (सामाजिक कार्यकर्ते) सौ. प्राजक्ता पेंदापल्लीवार(माजी नगराध्यक्ष) सौ. भाग्यश्री बेझलवार (ग्रामपंचायत सदस्य)सारीका गडपल्लीवार(सामाजिक कार्यकर्त्या) मल्लेश तोटावार(उपसरपंच,वेलगुर)चाणक्ष्य संदुकवार(सेवानिवृत्त विस्तार अधिकारी) रमेशजी तरैवार (सेवानिवृत्त वन अधिकारी) सत्कारमूर्ती श्रीमती. आशाताई रालबंडीवार आदींची उपस्थिती होती.तसेच समाजाच्या वतीने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आले व स्पर्धकांना प्रोत्साहपर बक्षीस देण्यात आले.अध्यक्षीय भाषणात एडवोकेट मेंगनवार यांनी समाज एकजुटता बद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री व दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय.दादासाहेब कन्नमवार यांची 10 जानेवारीला 125 वी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी साजरी करण्यात आली त्याची कारकीर्द कमी जरी असली तरी विदर्भाला आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 10 जानेवारी 1900 मध्ये दादासाहेबाचा जन्म झाला होता. एक वृत्तपत्र विक्रेते ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी झेप घेतली होती. बेलदार समाजाचे उच्च पदावर गेलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणून कर्मवीर. स्वर्गीय. दादासाहेब कन्नमवार साहेबांची ओळख आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश परसावार यांनी केले व
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. नलगुंटा सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री. चंद्रकांत बेझलवार, श्री.रोशन बेझलवार, श्री.रोहित मुक्कावार, श्री.राहुल मुप्पीडवार,श्री.सुबोध रालबंडीवार, श्री.विशाल कासेट्टीवार, श्री . रोहित तरैवार ,श्री.साई तुलसीगीरी , श्री.तिरुपती मंत्रीवार,श्री.तिरुपती भंडारवार,श्री.पुनेश कंदीकुरवार,श्री.राकेश अग्गुवार,श्री.समय्या नामनवार,श्री लक्ष्मण बेझलवार,श्री.संपत्ती चितावार,सौ.सुरेखाताई संदुकवार व सौ. रेक्ष्मा रालबंडीवार समाज बांधव व भगिनींनी यांनी परिश्रम घेतले.




