युवा प्रशिक्षणार्थ्यांचा रोजगार हिरावू नये आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची मागणी

0
34

अहेरी:
मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षणार्थ्यांना कार्यरत विभागातच कायम करावे, अशी मागणी अहेरी तालुका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली.

प्रशिक्षण काळात युवकांना विद्यावेतन मिळत असल्याने तात्पुरता रोजगार सुद्धा मिळालेला आहे. प्रशिक्षणादरम्यान शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे.
सदर प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होत नसेल तर प्रशिक्षणाचा फायदा काय? प्रशिक्षणानंतर रोजगार
द्यायचे नव्हते तर प्रशिक्षण दिले कशाला, असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.