अहेरी:
अहेरी उपविभागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली आल्लापल्ली येथील बस स्थानकावर एस.टी. महामंडळाच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता पसरली आहे.त्यामुळे बस स्थानकावर प्रवाश्यांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या एच एन पी व्ही विषाणू चा प्रसार होत असताना स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक असतांना महामंडळ या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
आलापल्ली हे मध्यवर्ती गाव असून या ठिकाणाहून चंद्रपूर, मूलचेरा, एटापल्ली, सिरोंचा ,भामरागड आदी.ठिकाणी जाण्यासाठी बसेस असतात.या ठिकानाहून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात.मात्र एस.टी.महामंडळाच्या दुर्लक्षा मुळे प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
बस स्थानकासमोर असलेल्या हात ठेकेचालक खरकटे पानी,उरलेले नास्ता पदार्थ समोरच टाकून जातात त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधी चा त्रास सहन करावा लागत आहे.डुक्कर व इतर जनावरे त्या ठिकाणी फिरत असल्याने आरोग्यासाठी घातक परिस्थिती उद्भवन्याची भीती आहे.
सोबतच महिला व पुरुष स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्वछतागृहतील बेसिन चे नळ बंद अवस्थेत आहेत.साफसफाई अनियमित होत असल्याने प्रवाश्यांना दुर्गंधी सहन करावी लागते आहे.
त्या सोबतच बसस्थानकालगत असलेली सेप्टिक टॅंक फुटली असल्याने त्याचे पानी वाहत आहे.त्यामुळेही दुर्गंधी चे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे प्रवाश्यांना आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.




