लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; घटनेची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची मागणी.

0
2

गडचिरोली :

 अहेरी तालुक्यातील कापेवंचा गाव येथे दोन महिन्यांच्या बाळाचे लसीकरण केल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम, जिल्हा समन्वयक मिंटू सय्यद तसेच  शिवसैनिकांनी कापेवंचा गाव येथे जाऊन मृत बाळाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या दुःखात सहभागी होत शोकसंवेदना व्यक्त केल्या.

यावेळी संबंधित कुटुंबीयांकडून घटनेची माहिती जाणून घेत लसीकरणानंतर झालेल्या या दुर्दैवी मृत्यूची वैद्यकीय व प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोष अथवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी हमी जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम यांनी कुटुंबीयांना दिली.

या प्रकरणात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी आणि पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.