अहेरी :
महाराष्ट्र शासनाच्या कॅपेटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक राशन कार्ड, एक साडी’ या उपक्रमाद्वारे अहेरी तालुक्यातील खमनचेरु येथील रास्त भाव दुकानामध्ये अंत्योदय राशन कार्डधारकांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच सायलू मडावी यांच्या शुभहस्ते पात्र महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे तालुक्यातील गरजू व पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला असून लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सायलू मडावी, रास्त भाव दुकानदार प्रशांत पत्तीवार, भगवान मडावी यांच्यासह अंत्योदय योजनेच्या लाभार्थी महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




