आलापल्लीत पोलिसांची मोठी कारवाई: ८ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह देशी दारूचा साठा जप्त; कार चालक फरार.

0
7
Oplus_16908288

अहेरी

अहेरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली येथे पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून होणारी अवैध देशी दारूची वाहतूक पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूचे बॉक्स आणि कार असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, कारवाई दरम्यान कार चालक अंधाराचा फायदा घेऊन गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.

गोंड मोहल्ला परिसरातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका चारचाकी वाहनातून अवैध दारू ची तस्करी होणार आहे याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.शनिवारी पहाटे दिनांक रोजी पहाटे ३:३० ते ४:४० वाजण्याच्या सुमारास एक स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येत असताना पोलीसांनी हात दाखविला मात्र चालकाने कार न थांबवता आलापल्ली येथील गोंड मोहल्ला भागात टाकली .त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन कार ठेवून कार चालक पसार झाला .

असा मिळाला मुद्देमाल

पोलिसांनी दोन पंचांसमक्ष संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारची (क्र. MH 04 FZ 5092) झडती घेतली. या झडतीदरम्यान कारमध्ये विनापरवाना व अवैध रित्या वाहतूक केला जाणारा खालील मुद्देमाल आढळून आला:

  • देशी दारू: ९० एम.एल. मापाच्या ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ कंपनीचे एकूण ४० बॉक्स (प्रत्येकी १०० नग, एकूण ४,००० नग). बाजारभावानुसार प्रति नग ८० रुपये प्रमाणे एकूण ३,२०,०००/- रुपये किमतीची दारू.

  • कार: गुन्ह्यात वापरण्यात आलेली जुनी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार, अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये.

  • एकूण जप्त मुद्देमाल: ८,२०,०००/- रुपये.

कार चालक फरार: पोलिसांना पाहताच स्विफ्ट कार चालकाने अंधाराचा फायदा घेतला आणि गाडी घटनास्थळावरच सोडून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल व पुढील तपास

या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २२१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार पोलीस हवालदार मनोज शेंडे (बक्कल नं. ११६५) यांनी केली असून, या कारवाईत पोलीस हवालदार महेश सडमेक,ज्ञानेश्वर निलावार यांनी सहभाग घेतला अधीक तपास अहेरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मंगेश वळवी करीत आहेत.