नागपूर:प्रतिनिधी
अविरल फिल्म्स आयोजित ‘कलावंत सन्मान सोहळ्या’त मराठी चित्रपट ‘मी हनुमंत रिक्षावाला’ मधील दमदार अभिनयासाठी चिरंजीव किश्टय्या गड्डमवार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘मी हनुमंत रिक्षावाला’ या चित्रपटाचे निर्माते विनोद जैस्वाल तर दिग्दर्शक हमीद पटेल आहेत. या चित्रपटातील चिरंजीव गड्डमवार यांच्या प्रभावी अभिनयाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याच सोहळ्यात कुंतल खोजरे यांचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, कलाकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिरंजीव किश्टय्या गड्डमवार यांनी हा सन्मान चित्रपटाचे निर्माते विनोद जैस्वाल, दिग्दर्शक हमीद पटेल, सहकलाकार, तंत्रज्ञ, कुटुंबीय आणि प्रेक्षकांना समर्पित केला.
दरम्यान, अस्तित्व स्टुडिओ फिल्म प्रोडक्शन यांच्या प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट “गोष्ट सुरू होते” या चित्रपटाचे निर्माते चिरंजीव किष्टय्या गडुमवार कुंतल खोजरे गजानन गेडाम ज्ञानेश्वर मोथे रिलीजचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.




