अहेरी:आलापल्ली येथील ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कूल, आलापल्ली यांनी इयत्ता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेत यंदाही शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शाळेतील कु. नेहा बोम्मावार हिने 94.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. अवनी बोम्मावार हिने 94.20% गुणांसह द्वितीय तर कु. तनुश्री राठोड हिने 90.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच आदित्य बंदेला (88.40%), एकांत नवघरे (86.80%), पलक बत्तुलवार (86.40%), तमन्ना उमाटे (86.20%), पवनकुमार निलम (85.00%), हीना मेश्राम (78.60%) व दिप्तिका बत्तुलवार (75.00%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.या परीक्षेत शाळेतील 03 विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये स्थान मिळविले असून 07 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन, 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 10 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.गेल्या 20 वर्षांपासून उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा जपणाऱ्या ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कूलच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.




