युवकांनी आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारांमध्ये सहभाग व्हावे- माजी आमदार दिपकदादा आत्राम जय पेरसापेन क्रिकेट क्लब पेरमिली कडून ग्रामीण भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

0
4

अहेरी: 6 फेब्रुवारी

खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिगत होते.समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची वृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लागते यामुळे प्रत्येक युवकांनी आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले.

“जय पेरसापेन क्रिकेट क्लब पेरमिली तर्फे आयोजित क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.

*या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच प्रमोद आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून पेरमिली उप पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी दिपक सोनवणे, तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ पठाण,पत्रकार श्रीकांत दुर्गे,पत्रकार साई चंदनखेडे, बापूजी सडमेक,रघुनाथजी सडमेक,भिऊजी कोडापे,भलाई मंडल,शंकर गावडे,देवराव मडावी,जगन्नाथ सडमेक,रुपेश सडमेक,वसंत आलाम, संजय आक्केवार,जुलेख शेख,संदीप बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातुन आलेले खेळाडू उपस्थित होते.* *उदघाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी अमर सडमेक,आकाश आत्राम,करण सडमेक,दिनेश मेश्राम,वसंत सडमेक,नितीन पोरतेट,वैष्णव कोडापे,विपुल आत्राम,संकेत मडावी यांनी परिश्रम घेतले.