अहेरी पोलिसांनी पकडला २.७१ लाखांचा हुक्का तंबाखू; कारसह ६.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
3

अहेरी (गडचिरोली):

जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गेर्या फाटा परिसरात कारमधून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा २ लाख ७१ हजार २०० रुपये किमतीचा सुगंधी हुक्का तंबाखू जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.कारवाईचा तपशीलमिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अहेरी पोलिसांनी गेर्या फाट्यापासून ३ किमी पश्चिमेला नाकाबंदी करून एका मारुती सुझुकी सेलेरिओ कारची (क्र. MH 33 AC 2024) झडती घेतली. यावेळी कारमध्ये पांढऱ्या रंगाच्या ६ चुंबड्यांमध्ये लपवून ठेवलेले ‘मजा १०८ हुक्का फ्लेवर’ तंबाखूचे एकूण २४० डबे आढळून आले.जप्त केलेला मुद्देमाल

  1. हुक्का तंबाखू: २४० डबे (प्रति डब्बा ११३०/- रु.) – एकूण किंमत २,७१,२२,००/- रु.

  2. वाहन: मारुती सुझुकी सेलेरिओ कार – अंदाजे किंमत ४,००,०००/- रु.

  3. एकूण मुद्देमाल: ६,७१,२००/- रुपये.आरोपींची नावे१) सोहेल शिराज खान पठाण (वय २१ वर्षे, रा. आलापल्ली)२) इसरार हुसेन शेख (वय ३७ वर्षे, रा. बाजारवाडी, आलापल्ली)गुन्हा दाखल व तपासया प्रकरणी पोलीस नाईक मंगेश शामराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात BNS २०२३ च्या कलम १२३, २७४, २७७, २७८, ३(५) अन्वये गुन्हा (अप. क्र. ००९/२०२६) दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे करीत आहेत. .