वनरक्षक निलेश धोंगडे यांची राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी!

0
4
  • अहेरी: 27 नोव्हेंबर

ड्रॅगन बोट भारत आणि पारंपारिक क्रीडा महासंघ (IDBF, ADBF संलग्न) यांच्या वतीने आयोजित १२ वी राष्ट्रीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ, २३ वर्षाखालील, ज्युनियर, पुरुष आणि महिला) २०२५-२६ आणि तिसरी पॅरा ड्रॅगन बोट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २४ ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पात पार पडली.

या महत्त्वपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, आलापल्ली (गडचिरोली) येथील वन विकास महामंडळात कार्यरत असणारे वनरक्षक निलेश किशोरराव धोंगडे यांनी सीनियर गटात ऐतिहासिक यश मिळवले.

पुरुष DB 22 – ५०० मीटर या क्रिडाप्रकारात

निलेश धोंगडे यांनी हे कांस्यपदक जिंकून केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर गडचिरोली परिसराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

६व्या आशियाई बीच गेम्स २०२६ साठी महत्त्वाचे पाऊल

या राष्ट्रीय स्पर्धेचे महत्त्व अधिक होते, कारण यातील कामगिरीच्या आधारावरच सान्या हैनान, चीन येथे २०२६ मध्ये होणाऱ्या ६व्या आशियाई बीच गेम्स साठी भारतीय ड्रॅगन बोट संघाची निवड होणार आहे. निलेश धोंगडे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची भारतीय संभाव्य संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल वनरक्षक निलेश धोंगडे यांच्यावर आलापल्ली परिसरातून आणि वनविभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कर्तव्य आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा आदर्श इतरांसमोर ठेवला गेला आहे.